पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर पाकिस्तानने सावध फलंदाजी केली. सामन्यात न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीत आहे, मात्र हा सामना बरोबरीत राहण्याच्या दिशेने जाताना दिसतोय. महत्वाचं म्हणजे या सामन्यात पाकिस्तनाचा यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद याला चार वर्षानंतर कसोटी सांघट स्थान देण्यात आले. शाहिद आफ्रिदी निवड समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सरफराजला संघात स्थान मिळाले. त्याने फलंदाजीत चमक दाखवली, मात्र त्याचे गचाळ यष्टिरक्षण आता चर्चेचा विषय बनलाय.
#WomensT20WorldCup | पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार; भारतीय संघाची घोषणा
सरफराज अहमदला संघात घेतल्यापासून त्याच्या गचाळ यष्टिरक्षणापर्यंत तो आता ट्रोल होताना दिसत आहे. कारण त्याने त्याच्या चुकीमुळे पहिल्या डावात न्यूझीलंडच्या फलंदाजीवेळी संघाला ५ धावांचा फटका बसला. त्याचबरोबर त्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला अवघ्या २१ धावांवर यष्टिचित करण्याची सोपी संधी चुकवली होती. त्यानंतर आजच्या ५ अतिरिक्त धावा गेल्याने नेटकऱ्यांनी सरफराजवर निशाणा साधलाय.
#WomensT20WorldCup | पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार; भारतीय संघाची घोषणा
घडले असे की,”न्यूझीलंडच्या डावाच्या १६० व्या षटकात केन विल्यमसन फलंदाजी करत होता. यावेळी पाकिस्तनचा गोलंदाज नौमान अलीच्या षटकातील एक चेंडू पॅडच्या दिशेने आल्याने विल्यमसनने त्या चेंडूला न खेळणे पसंत केले. त्यामुळे तो चेंडू यष्टिरक्षण करत असलेल्या सरफराज अहमदच्या दोन्ही पायांमधून निसटला. मागे ठेवलेल्या हेल्मेटला चेंडू आदळल्याने नियमानुसार न्यूझीलंडला ५ अतिरिक्त धावा मिळाल्या. त्याच्या या चुकांमुळे तो सध्या ट्रोल होताना दिसत आहे.
“We have to stop for a concussion protocol?” 🤔
Five penalty runs to New Zealand after the ball hits the helmet 🪖#PAKvNZ | #TayyariKiwiHai pic.twitter.com/JtFelmUgal
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 29, 2022