PAK VS ENG : वेगवान गोलंदाजीमुळे अनेक वेळा फलंदाज जखमी झाल्याचे क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळाले आहे. पण काहीवेळा तर फलंदाजाने खेळलेल्या चेंडूच्या निशाण्यावर पंचही येतात. सामन्यादरम्यान अंपायरला चेंडूचा जोरदार फटका बसण्याची घटना घडली आहे. यावेळी अंपायर अलीम दार यांना फंदाजाने टोलवलेल्या चेंडूचा जोराचा फटका बसला. पाकिस्तान आणि इंग्लंड ( PAK VS ENG ) यांच्यातील ७ सामन्यांच्या मालिकेतील सहावा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना (Pakistan vs England T20) शुक्रवारी लाहोरमध्ये खेळला गेला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ४ षटकांपर्यंत २ विकेट गमावून २६ धावा केल्या होत्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर हैदर अलीने पुल शॉट मारला, जो अंपायर अली दार यांना जाऊन लागला. सुदैवाने अंपायरला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही आणि अलीम दार हे अंपायरींग करत राहिले. या घटनेचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ( PAK vs ENG T20I Match Pakistan Batsman accidentally played Shot Caugh umpire aleem Dar )
Ouch! 😬#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/DaD6EwSaVV
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 30, 2022
सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ५९ चेंडूत नाबाद ८७ धावांची खेळी करत यजमानांना २० षटकांत ६ गडी गमावून १६९ धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, इंग्लंडकडून फिलिप सॉल्टच्या जबरदस्त खेळीमुळे इंग्लंडने हा सामना ८ गडी राखून जिंकला. त्यामुळे मालिकेत दोन्ही संघ सध्या ३-३ ने बरोबरीत आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड ( PAK VS ENG ) संघ आता शेवटच्या सामन्यात मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील.