नवी दिल्ली – सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन 26 टक्क्यांनी वाढून 1.47 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, असे वित्त मंत्रालयाने शनिवारी सांगितले. गेले सलग सात महिने जीएसटी कलेक्शन 1 लाख 40 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये एकूण जीएसटी महसूल 1,47,686 कोटी रुपये इतका झाला. ज्यामध्ये केंद्रीय जीएसटी 25,271 कोटी रुपये, राज्य जीएसटी 31,813 कोटी रुपये तसेच एकात्मिक जीएसटी 80,464 कोटी रुपये आहे असे कलेक्शन झाले आहे. आणि सेस 10,137 कोटी रुपये इतका आहे.
हा सेस राज्यांना जीएसटी कलेक्शन मध्ये येणाऱ्या तुटीबद्दल नुकसान भरपाई म्हणून दिला जाणार आहे. त्या नुकसान भरपाईच्या सोयीसाठीच हा सेस लागू करण्यात आला होता असे सांगण्यात येते. वाढीव जीएसटी कलेक्शन हे आर्थिक उलाढाल वाढीची निदर्शक मानली जाते.