पुणे – पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा नवा अध्याय ठरणाऱ्या मेट्रो प्रकल्पासह, महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. ६) एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पुणे महापालिकेत येणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत.
यावेळी पुणे महापालिकेत मोदींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. मोदींचा सत्कार करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खास फेटा तयार करून घेतला आहे. पैठणीच्या कापडावर खास जरीकाम करून त्यावर ऑस्ट्रेलियन डायमंड लावलेला हा फेटा आहे. तसेच या फेट्यावर सूर्यफूल काढण्यात आलं असून त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा तयार केली आहे.
सध्या सर्वत्र मोदींच्या या फोटोची चर्चा होतानी दिसत आहे. या फेट्याची डिझाईन ऐतिहासिक पद्धतीने तयार करण्यात आले असल्याचे प्रसिद्ध फेटेवाले मुरुडकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याने राज्यशासनाकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई हे पंतप्रधानांचे पुण्यात स्वागत करणार आहेत.