मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात येणार असून ते पुणे दौरा करणार आहे. पुण्यातील बहुप्रतिक्षित मेट्रोचा प्रारंभ मोदी करणार आहेत. मात्र मोदींच्या येण्याआधीच महाराष्ट्राचं राजकारण तापल्याच दिसून येत आहे. मोदींच्या दौऱ्याच्या एकदिवस आधी शरद पवारांनी मेट्रोच्या कामाबाबत विधान केलं होतं. त्याला भाजपने चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
शरद पवारांच्या या विधानानंतर भाजपानं ट्विटर हँडलवरून निशाणा साधला आहे.
काय आहे ट्विट
“आदरणीय शरद पवारजी, पुणे मेट्रोचं काम अर्धवट आहे तर, लोक झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतलं होतं ना? तुमची अडचण इथे आहे की, मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत जमलं नाही”, असं भाजपानं म्हटलं आहे.
आदरणीय @PawarSpeaks जी, 50 वर्षीय राजकारणात तुम्ही किती किलोमीटरचे मेट्रो प्रकल्प पुण्यात केलात? ज्यांनी केलं त्यांचं कौतुक करण्यासाठी तरी मनाचा मोठेपणा दाखवा!
ट्रायलसाठी लगबगीने गेलात, आता म्हणता अर्धवट काम? पवार साहेब हा फोटो पुणे मेट्रोतील आहे.#MaharashtraWithModi pic.twitter.com/TGOG6He3UV— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 6, 2022