पुणे : पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते महत्त्वाकांक्षी अशा पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालयाजवळी मार्गिकेचे उद्घाटन केले जाणार आहे. मोदींची आज एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभा देखील होणार आहे. या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शहरभर ठिकठिकाणी आंदोलन करून विरोध दर्शवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याला राष्ट्रवादीकाँग्रेसकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर मुक निदर्शने केली आहेत. एवढेच नाही तर काँग्रेसकडून या दौऱ्याच्या विरोधात टिळक चौकात आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.