मुंबई – भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि अभिनेते धर्मेंद्र यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या प्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी या संबंधात एका ट्विटर संदेशात म्हटले आहे की, माझ्या शेतकरी बंधुंची सध्याची हालाकीची स्थिती पाहून माझ्या मनाला अतिशय वेदना होत आहेत, सरकारने त्यांच्यासाठी त्वरीत काहीं पावले उचलली पाहिजेत.
85 वर्षीय धर्मेंद्र हे राजस्थानातल्या बिकानेर मतदार संघातील भाजपचे खासदार होते. त्यांचे पुत्र सन्नी देवल आणि त्यांच्या पत्नी हेमामालिनी याही सध्या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या मताला विशेष महत्व दिले जात आहे.
ते स्वत:लाही शेतकरी मानतात. त्यांनी मागच्याच आठवड्यात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांचा विषय त्वरीत मार्गी लावण्याचे आवाहन सरकारला केले होते. पण त्यांच्या या ट्विटर संदेशावर अनेक भाजप समर्थकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ते ट्विट मागे घेतले होते पण आज पुन्हा एकदा त्यांनी शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करणारा संदेश जारी केला आहे.