Dharmendra : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र वयाच्या 88 व्या वर्षी देखील कामामधील उत्साह कमालीचा आहे. नुकतेच धर्मेंद्र ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटात पाहायला मिळाले होते. मात्र आता या चित्रपटात धर्मेंद्र शाहिद कपूरच्या आजोबांच्या भूमिकेत दिसत आहे.’तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’च्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. धर्मेंद्र यांनी आपले ऑनस्क्रीन नाव बदलले आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’मध्ये धर्मेंद्र यांना अन्य नावाने श्रेय देण्यात आले आहे. धर्मेंद्र यांचे नाव धरम सिंह देओल असेच आहे. मात्र, चित्रपटसृष्टीत त्यांनी आपले ऑनस्क्रीन नाव बदलून धर्मेंद्र असे ठेवले. त्यांनी आपले पूर्ण नाव कधीही वापरले नाही. त्यांनी कायम धर्मेंद्र असेच नाव वापरले.
आता ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ चित्रपटात त्यांनी आपले पूर्ण नाव वापरण्यास सुरुवात केली आहे. परंतु यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सिनेइंडस्ट्रीत आल्यानंतर 64 वर्षांनंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र याबाबत त्यांनी स्वत: कोणतीही माहिती दिलेली नाही.
‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर, कृती सेनन सिफ्रा नावाच्या एका रोबोटची भूमिका साकारत आहे. तर शाहिद कपूर आर्यन नावाची भूमिका साकारत असून तो तिच्या प्रेमात असल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ ने पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटापूर्वी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातदेखील धर्मेंद्र झळकले होते.
हेही वाचा:
धर्मेंद्र यांचा शबाना आझमींसोबतचा लिपलॉक सीन चर्चेत; ट्वीट करत अभिनेता म्हणाला “या वयात…”