वाघोली – सध्याच्या कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाघोली यांनी वाघोली हाऊसिंग सोसायटीज असोसिएशन आणि नॅशनल सोशल ग्रुप यांच्या सहकार्याने वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट दिला. ज्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी झाली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावयाचे आहे त्यास ५ लिटर प्रति मिनिट या प्रमाणे ऑक्सिजन पुरविण्याचे काम हे मशीन करते. थोडक्यात जीवन रक्षक प्रणालीच काम करत असल्याची माहिती संजीवकुमार पाटील यांनी दिली आहे.