ओवेसी पंतप्रधानांवर भडकले

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांबरोबर ८ एप्रिल रोजी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. मात्र पंतप्रधानाचे निमंत्रण न मिळाल्याने एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी मात्र भडकले आहेत. एमआयएमला बैठकीला न बोलावणे म्हणजे हैदराबाद आणि औरंगाबादच्या लोकांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी पीएमओला टि्वट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटमध्ये तेम्हणाले कि, हैद्राबाद आणि औरंगाबादच्या जनतेने मला आणि इम्तियाज जलील यांना निवडून दिले आहे. आम्हाला त्याचे प्रश्न मांडण्यापासून रोखल्या जात आहे. हैदराबादेत कोरोनाचे ९३ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना विषाणूसंदर्भात देशाला कसे लढता येईल त्यासंदर्भात माझे विचार मला मांडण्याची इच्छा आहे. पुढे त्यानं लिहले आहे कि, आम्हाला निमंत्रण न दिल्यामुळे हा औरंगाबाद आणि हैद्राबादच्या जनतेच्या अपमान आहे. खासदार म्हणून जनतेचे प्रश्न तुमच्यासमोर मांडणे आमचे काम आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.