लॉक डाऊनमुळे 16 हजार कोटींचे ऑनलाईन व्यवहार घटले

ऑनलाईन व्यवहारही थंडावले

नवी दिल्ली – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरू असणाऱया लॉकडाऊनचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहारही थंडावलेले आहेत. फेब्रुवारी महिन्याशी तुलना करता मार्च महिन्यात युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) आणि “भीम ऍप’द्वारे होणारे आर्थिक व्यवहारात 16 हजार 055 कोटी रुपये कमी झाला आहे, अशी माहिती नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआय) सीईओ प्रवीण रॉय यांनी दिली आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. आर्थिक उलाढाल ठप्प असल्याने ऑनलाईन आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. दरम्यान, जीवनावश्‍यक वस्तुमध्ये रोखीने होणाऱया व्यवहारामध्ये पाच ते सहा टक्के वाढ झाली आहे. भाजी दुकानदार, पेट्रोल पंप, विविध बिले भरणा हे स्मार्ट फोनवरून करण्यासाठी आम्ही विशेष मोहिम सुरू केली असल्याचेही रॉय यांनी सांगितले. 15 मार्चनंतरच ऑनलाईन व्यवहारात घट झाली होती. मात्र 24 मार्चनंतर संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर यामध्ये मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्यांमध्येही ही घट कायम राहिल. मात्र भविष्यात ऑनलाईन आर्थिक व्यवहार पूर्ववत होतील, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करीत आहेत.

सारे काही सुरळीत झाल्यावर भेटू…
तसेच ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसह अनेक ऑनलाईन मार्केटींग करत असलेल्या कंपन्यांनीही त्यांच्या वेबसाईटवर “आमचे सर्व व्यवहार सध्या बंद आहेत. लवकरच सारे काही सुरळीत झाल्यावर भेटू…’ असे बॅनर्स प्रसिद्ध केले आहेत. काही ठिकाणी ऑर्डर्स घेऊन ठेवल्या जात असून, ग्राहकांना मालाच्या डिलिव्हरीची तारीख सांगितली जात नाही आहे. त्यामुळे केवळ काही अत्यावश्‍यक वस्तू, जसे की दवाखान्यांसाठी लागणारी निवडक उपकरणे, याव्यत्यिरिक्त सर्वच ऑनलाईन स्टोअर्स बंद ठेवण्यात आली आहेत. तर काही जणांनी फक्त पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट्‌स कीट्‌स (पीपीई) ऑनलाईन विक्रीसाठी ठेवली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.