ऑफिसमधील ओव्हरटाईमने वाढते हार्ट अटॅकची शक्‍यता

ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करणे हे खिशासाठी जरी चांगले असले तरी ते आरोग्यासाठी मात्र नक्‍कीच घातक ठरू शकते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, आठवड्यातून 55 तास काम करणाऱ्यांना साधारणत: 35 ते 40 तास काम करणाऱ्यांच्या तुलनेत हार्ट अटॅक येण्याची शक्‍यता जास्त आहे.

युनिव्हरसिटी ऑफ लंडनमधील काही प्राध्यापकांनी जास्त वेळ काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. 6 लाख लोकांवर याबाबतीत करण्यात आलेल्या संशोधनातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या संशोधनात युरोप्र, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले होते.

या संशोधनात काढण्यात आलेल्या निष्कर्षात आठवड्यातून 55 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका हा 35 ते 40 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा 13 टक्‍क्‍यांनी जास्त आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.