गृहकर्जावर ओव्हरड्राफ्ट फायदेशीर

घर खरेदीसाठी बॅंकेकडून गृहकर्ज मिळते. त्याचबरोबर गृहकर्जावर ओव्हरड्राफ्टची देखील सुविधा दिली जाते. ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय राहू शकतो. यानुसार अडचणींच्या काळात गरज पडल्यास आपण एकरकमी पैसा हा बचत खात्याप्रमाणे गृहकर्जातून काढू शकतो. अर्थात काही अटींच्या आधारावर बॅंक ओव्हरड्राफ्ट देते. साधारणपणे 0.25 टक्के अधिक व्याज ओव्हरड्राफ्टवर बॅंका आकारतात. याप्रमाणे एसबीआय गृहकर्जाच्या ओव्हरड्राफ्टवर 8.6 टक्‍क्‍यांपासून 9.75 व्याज आकारते. वीस वर्षाच्या कर्जाच्या कालावधीदरम्यान या सुविधेचा लाभ ग्राहक घेऊ शकतो. गृहकर्जावर ओव्हरड्राफ्टची सुविधा कशाप्रकारे मिळते, हे इथे सांगता येईल.

ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय?
गृहकर्ज घेणाऱ्या सर्व कर्जदारांना दरमहा निश्‍चित कालावधीपर्यंत ठराविक रक्कम हप्त्याच्या रूपातून जमा करावी लागते. त्याचवेळी गृहकर्जाच्या मुद्दलमध्ये आगाऊ रक्कम भरल्यास कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही. ओव्हरड्राफ्टच्या नियमानुसार जर आपण नियमित हप्त्याशिवाय आगाऊ रक्कम जमा केली असेल तर ती रक्कम गरज पडल्यास आरामात काढू शकता.

दहा टक्के व्याजाने वीस वर्षासाठी 30 लाखाचे गृहकर्ज घेतले असेल तर आपल्याला सुमारे 29 हजार रुपये हप्ता बसेल. एक वर्षानंतर आपल्याकडे एक लाख रुपये जमा होत असतील आणि ते गृहकर्जाचा बोजा कमी करण्यासाठी हप्त्याव्यतिरिक्त जमा करु शकतो. त्यावेळी आपले मुद्दल 29 लाख 50 हजार असेल आणि अतिरिक्त रुपये जमा केले तर मुद्दल 28.50 लाख राहील.त्याचबरोबर गरज पडल्यास आपण आगाऊ भरलेले एक लाख रुपये काढून घेऊ शकता.

सामान्य कर्जापेक्षा वेगळे कसे
आपण जेव्हा सामान्य गृहकर्ज घेतो तेव्हा 50 हजार किंवा एक लाख रुपये जमा करतो. त्यामुळे कर्जाचे ओझे कमी होते. गरज पडल्यास अतिरिक्त भरलेली रक्कम काढून घेतल्यास कर्जाचे ओझे पुन्हा वाढते.

अन्य कर्जापेक्षा स्वस्त
कठीण काळात ग्राहकांसाठी पर्सनल लोन हा एक सोपा पर्याय आहे. मात्र अशा प्रकारचे कर्ज पाच वर्षासाठी मिळू शकते आणि त्याचा व्याजदर हे 18 टक्‍क्‍यांपर्यंत असते. कालावधी कमी असल्याने त्याचा हप्ताही अधिक असतो. त्याचवेळी होमलोन ओव्हरड्राफ्टची सुविधा ही नियमित व्याजदरापेक्षा 0.05 ते 0.25 टक्के अधिक दरावर मिळते. हे पर्सनल लोनपेक्षा बऱ्याचअंशी स्वस्त आहे.

– अनिल विद्याधर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)