अखेर अभिजित बिचुकले ची कारागृहात रवानगी

सातारा : चेक बाऊन्स प्रकरणी कालपासून सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजित बिचुकलेला त्या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी सन 2012 साली त्याच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणात  न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला असल्याने अभिजित बिचुकलेची सातारा जिल्हा कारागृहात रवानगी होणार आहे.

चेक बाऊन्स प्रकरणी  सुट्टीकालीन न्यायाधीश आर. व्ही. पाटील यांच्यापुढे सुनावणी झाली . सुमारे एक तासहून अधिक सुरू असलेल्या युक्तीवादानंतर बिचुकलेला या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

मात्र, खंडणी प्रकरणात न्यायमूर्तींनी बिचुकले चा जामीन फेटाळला असल्याने बिग बॉसच्या घरातील बिचुकले स्थान धोक्यात आल्याचे बोलले जात आहे .

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here