सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 546 नागरिकांना मंगळवारी घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर आणखी 348 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 47, कराड उपजिल्हा रुग्णालयात व फलटण उपजिल्हा रुग्णालयातील प्रत्येकी सहा, कोरेगावमधील 54, वाईतील 25, खंडाळा येथील 14, रायगावमधील 27, पानमळेवाडीतील 24, मायणीतील 18, महाबळेश्वरमधील दहा, पाटणमधील 33, दहिवडीतील 24, म्हसवडमधील सात, पिंपोडे येथील पाच व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 48, असे एकूण 348 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.