मुंबई – वरळी सी लिंकवर रविवारी झालेल्या अपघातात धावपटू महिलेचा मृत्यू झाला आहे. ही धावपटू महिला लंडन मॅरेथॉनची तयारी करत होती. सकाळी साडेसहा वाजता सराव करत असताना त्या महिलेला एका ईलेक्ट्रीक कारने चिरडले. त्यात तिचा मृत्यू झाला.
राजलक्ष्मी विजय, असे या धावपटू महिलेचे नाव आहे. त्या अल्टिस्ट टेक्नॉलॉजिस या टेक फर्मच्या सीईओ होत्या. 2023च्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. राजलक्ष्मी या फिटनेस जागरुक होत्या. त्या जॉगर्स फोरमचा भागही होत्या. लंडनमध्ये मॅरेथॉन होणार आहे. त्याचा सराव करण्यासाठी त्या सकाळी बाहेर पडल्या होत्या.
त्या सी लिंकवर असताना, एका भरधाव ईलेक्ट्रीक कारने त्यांना चिरडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Maharashtra : भाजप-राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा एकत्र हवाई प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पोलिसांनी इलेक्ट्रीक कार चालकाला अटक केली आहे. समर मर्चंट असे या कार चालकाचे नाव आहे. निष्काळजीपणे वाहन चालवणे, मृत्यूस कारणीभूत ठरणे या कलमांतर्गत मर्चंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.