नांदेड :– भाजप नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक ते नांदेड आणि नांदेड ते नाशिक असा एकत्र विमान प्रवास रविवारी केला. या दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे आता राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु यावर मंत्री गिरीश महाजन दोघांचा प्रवास अगदी योगायोगाने झाल्याचे स्पष्टीकरण दिली आहे.
“आमचा एकत्र प्रवास म्हणजे निव्वळ एक योगायोग होता,’ असे सांगताना मंत्री महाजन यांनी यावेळी राष्ट्रवादीला खोचक टोला देखील लगावला आहे.
Elections 2024 : विधानसभेच्या जागा वाटपाबाबत बावनकुळे यांचे घुमजाव, म्हणाले “अजून जागा…”
भाजपच्या विरोधकांना रोज पंतप्रधान होण्याचे तर काहींना मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडत असतात. त्यातून ते एकमेकांना शुभेच्छा देण्यात व्यस्त असतात. परंतु हे पद मिळवण्यासाठी आधी आमदार, खासदार निवडून आणावे लागतात, असा टोला मंत्री महाजन यांनी लगावला आहे.