नवी दिल्ली : प्रसिद्ध केशरचनाकार जावेद हबीब यांना महिलेच्या केसात थुंकणे चांगलेच महागात पडले आहे. कर्ण या प्रकरणी त्यांच्यावर मुझफ्फरनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सेमिनारमध्ये जावेद हबीब यांनी एका महिलेच्या केसात थुंकले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. महिलेच्या तक्रारीवरून मन्सूरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथीच्या कायद्याशी संबंधित कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता जावेद हबीब यांनी माफी मागितली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये जावेद हबीब महिलेला केस कोरडे असल्याचे सांगत आहेत. यानंतर महिलेच्या केसांमध्ये कंगवा फिरवताना केसांसाठी पाण्याची कमतरता असेल तर हबीब महिलेच्या केसांवर थुंकतात आणि थुंकीत जीव असल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ मुजफ्फरनगरमधील एका कार्यक्रमाचा आहे. ३ जानेवारीला एका शोमध्ये हबीब यांनी केसांची देखभाल आणि शॅम्पूचे महत्त्व सांगून पूजा गुप्ताच्या केसात थुंकले होते. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जावेद हबीब और उसके नाम के किसी भी सैलून में जाने से पहले ये वीडियो ज़रूर देख लें… हबीब का ब्रांड ही थूक पर चलता है. शर्मनाक pic.twitter.com/MaCJCKJS0N
— Himanshu Mishra 🇮🇳 (@himanshulive07) January 5, 2022
हे प्रकरण वाढत असताना जावेद हबीब यांनी गुरुवारी रात्री उशिरा इंस्टाग्रामवर माफी मागितली. त्याने म्हटलेले शब्द परत घेतले आणि माफी मागितली. ‘माझ्या सेमिनारमधील काही शब्दांमुळे काही लोक दुखावले गेले आहेत. आमचे सेमिनार व्यावसायिक आहेत. हे शो खूप वेळ चालतात. मी फक्त एकच सांगतो, माझ्या मनापासून. कोणाला वाईट वाटले असल्यास क्षमस्व. माफ करा, मनापासून माफी मागतो.
UP : जावेद हबीब भी “थूक कांड” में शामिल हो गए। बता रहे हैं कि पानी नहीं है तो थूक से भी बाल बनाये जा सकते हैं। वीडियो मुजफ्फरनगर की बताई गई। pic.twitter.com/glsJlDdjYq
— Sachin Gupta (@sachingupta787) January 5, 2022
राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना त्या व्हिडिओची सत्यता तपासण्यास सांगितले ज्यामध्ये प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब एका महिलेच्या केसांमध्ये थुंकताना दिसत आहे. आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही याचा तीव्र निषेध तर करतोच पण या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासता यावी यासाठी तुमचा तात्काळ हस्तक्षेप हवा आहे.”
महिला आयोगाच्या म्हणण्यानुसार, ही घटना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या कोविडवरील मार्गदर्शक तत्त्वांचेही उल्लंघन करणारी आहे आणि अशा परिस्थितीत लोकांमध्ये थुंकणे हा देखील दंडनीय गुन्हा आहे. आयोगाने जावेद हबीब यांनाही सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे.