मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीनंतर अखेर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.
25 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले असल्याचं दिसून आलं आहे. आज चित्रपट प्रदर्शित होवून 11 दिवस झाले आहेत. पण तरी देखील या चित्रपटाची चर्चा कमी होत नसल्याचं चित्र दिसत आहे. अशात उत्तर प्रदेश येथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रपटाच्या अनेक मुद्द्यांवर स्वतःची भूमिका मांडली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी पठाण चित्रपटावर घालण्यात येणाऱ्या बहिष्काराबद्दल आपलं मत वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांचे हे व्यक्तव चांगलेच चर्चेत आले आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पठाण चित्रपटाबाबत प्रश्न विचारताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “सॉरी, मी हा चित्रपट पाहू शकत नाही. माझ्याकडे इतका वेळ नाही. कारण 25 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात…
मी कलाकारांचा आदर करतो, साहित्यकारांचा आदर करतो, ज्यांच्यामध्ये कोणती प्रतिभा असेल त्यांचा मी आदर करतो. माझ्याकडे चित्रपट पाहण्यासाठी वेळ नाही, पण आम्ही कलाकारांचा आदर करतो’. असं योगी म्हणाले. सध्या त्यांचं हे व्यक्तव सगळीकडे व्हायरल होत आहे.