Lee Sun Kyun : दक्षिण कोरियाचा अभिनेता ली सन क्युन (Lee Sun Kyun) याचे 27 डिसेंबर रोजी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. 48 वर्षीय अभिनेत्याचा कारमध्ये मृतदेह कारमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पॅरासाइट चित्रपटातील अभिनयाने त्यांनी जगभरात विशेष ओळख मिळवली. 2020 साली ‘पॅरासाइट’ हा कोरियन चित्रपट ऑस्करमुळे चांगलाच चर्चेत आला होता. दक्षिण कोरियाच्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार स्थानिक पोलिसांना आत्महत्येचा संशय आहे.
उत्तम दिग्दर्शन, उत्तम पटकथा, उत्तम फॉरेन फिल्म यासाठी ऑस्कर ‘पॅरासाइट’ने ऑस्कर पटकावला होता. या चित्रपटात त्याने पार्क-डोंग इक हे महत्त्वाचं पात्र साकारलं होत. दक्षिण कोरियामधील सोल शहरात एका पार्किंग लॉटमध्ये ली सन-क्यूनचा मृतदेह आढळला आहे. गेल्या काही दिवसांपासून ली सन-क्यून हा अवैध ड्रग्जचे सेवन करण्याच्या प्रकरणात अडकला होता ज्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू होती. यामुळे तो चांगलाच चर्चेत होता. या प्रकरणामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ऑक्टोबरमध्ये त्याच्यावर बेकायदेशीर अंमली पदार्थ वापरल्याचा आरोप होता आणि तेव्हापासून त्याची चौकशी सुरू होती. ली सन क्यून अनेक वर्षांपासून दक्षिण कोरियाच्या चित्रपट उद्योगाशी संबंधित आहेत.या प्रकरणात आपली बाजू मांडताना एका नाइट क्लबमध्ये चुकून ड्रग्ज घेतल्याचं ली सन-क्यूनने कबूल केलं होतं. या प्रकरणात दोषी नसल्याचं दावाही तो करत होता.
मृत्यूआधी त्याने एक पत्र लिहिलेले त्याची पत्नी योनहॅपला मिळालं आहे. मात्र ली सन-क्यूनने त्या पत्रात नेमकं काय लिहिलं आहे याचा खुलासा झालेला नाही. त्यामुळे ही नेमकी आत्महत्या आहे की आणखी काही याचा पोलिस तपास करत आहे.