मात्र, नंतर ही पोस्ट फक्त ‘अभिनंदन’ अशी शेअर करण्यात आली. जेव्हापासून अभिनेत्री रुबिना आई झाल्याची बातमी समोर आली तेव्हापासून चाहते तिच्या मुलींची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. अशात आता टीव्ही बॉस लेडी रुबिनाने स्वतः तिच्या मुलींचे फोटो आणि त्यांची नावे चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमानातून शेअर केली आहे.
रुबिनाने तिच्या पोस्टमध्ये तिच्या जुळ्या मुलीच्या जन्माला एक महिना झाला आहे असेही सांगितले आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर माहिती शेअर करताना रुबिना दिलीकने सांगितले की, गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये गुरुपूरच्या खास प्रसंगी तिच्या मुलींचा जन्म झाला.’ ही पोस्ट शेअर करण्यासोबतच रुबिना आणि अभिनव यांनी त्यांच्या मुलींची नावेही उघड केली. या प्रसिद्ध टीव्ही जोडप्याने त्यांच्या मुलींचे नाव जीवा आणि एधा ठेवले आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही हे सांगताना खूप आनंदी आणि उत्साहित आहोत की आमच्या लेकी जीवा आणि एधा आज 1 महिन्याच्या झाल्या आहेत.’ गुरुपूरबच्या विशेष प्रसंगी, विश्वाने आपल्याला मुलींच्या रूपात सुंदर भेटवस्तू दिल्या आहेत. रुबिना दिलीकने हे फोटो शेअर करताच चाहत्यांकडून आणि स्टार्सकडून अभिनंदनाचा पूर आला.