नवी दिल्ली – यंदाच्या 95व्या ऑस्कर सोहळ्याला आता काही दिवस राहिले आहेत. 12 मार्च 2023 ला ऑस्कर सोहळा होणार आहे. कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्या देखील हातात असावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. भारतासाठी यंदाचा हा सोहळा खूप खास आहे.
याच कारण म्हणजे ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला नॉमिनेशन मिळालं आहे. आता पर्यंत ‘नाटू नाटू’ गाणं अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गाजलं. या गाण्यात अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची जबदस्त केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहता आली. भारतातील अनेक कलाकारांना जरी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत, परंतु भारताला आजपर्यंत एकही ऑस्कर पुरस्कार मिळालेला नाही.
दरम्यान, एकीकडे भारतासारख्या मोठ्या देशाला एकही ऑस्कर नाही, मात्र दुसरीकडे अशी एक व्यक्ती आहे ज्याने एकट्याने 20 हून अधिक ऑस्कर पुरस्कारावर आपलं नावं कोरलं आहे. तो आहे महान अॅनिमेशन चित्रपट निर्माता ‘वॉल्ट डिस्ने’. अॅनिमेशन जगताचा बादशाह म्हणून ओळख असणारा ‘वॉल्ट डिस्ने’ याने आपल्या व्यंगचित्रातून सर्वांचेच भरपूर मनोरंजन केले. आणि म्ह्णूनच त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण 26 ऑस्कर पुरस्कार मिळाले, जो एक जागतिक विक्रमच आहे. 6 वेगवेगळ्या श्रेणींसाठी नामांकन मिळालेले ते जगातील पहिले व्यक्ती होते. “टॉम अँड जेरी’ हे जगातील सर्वात लोकप्रिय कॉमेडी कार्टून शो देण्याचं श्रेय वॉल्ट डिस्नेला जातं.
View this post on Instagram
पहिला अकादमी पुरस्कार सादरीकरण 16 मे 1929 रोजी हॉलिवूड मधील रुझवेल्ट हॉटेलमध्ये सुमारे 270 लोकांच्या प्रेक्षकांसह खाजगी डिनर कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. यावेळी, ‘एमिल जिनिंग’ हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर दिला होता. तर, 1963 मध्ये ‘सिडनी पॉटियर’ हा पहिला कृष्णवर्णीय अभिनेता होता ज्याने ऑस्कर पुरस्कारावर आपले नावं कोरले. दरम्यान, आर एस ओवेंस आणि कंपनी 1982 पासून शिकागोमध्ये ऑस्कर पुतळे तयार करत असून, हा पुरस्कार 34cm उंच आणि 8.5 औंध पौंड वजनाचा असतो.