नवी दिल्ली – राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात आज ‘पर्पल फेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या दिव्यांगजनांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींनी दिव्यांगजनांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
अभ्यागतांसाठी दिवसभरात ‘नो युअर डिसॅबिलिटीज’, ‘पर्पल कॅफे’, ‘पर्पल कॅलिडोस्कोप’, ‘पर्पल लाइव्ह एक्सपिरियन्स झोन’, ‘पर्पल स्पोर्ट्स’ अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात १४ हजाराहून अधिक लोक सहभागी झाले होते.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘पर्पल फेस्ट’ चा उद्देश विविध प्रकारच्या अपंगत्वाबद्दल आणि त्याचा लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल जनजागृती करणे आणि समाजात दिव्यांग व्यक्तींना समजून घेणे, स्वीकारणे आणि त्यांना सामावून घेण्याला प्रोत्साहन देणे हा आहे.