पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड येथील, श्री साईनाथ बालक मंदिराच्या विद्यार्थ्यांनी नुकताच रात्रशाळेचा आनंद लुटला. बालक मंदिरात वर्षातून एकदा रात्रशाळा या कार्यक्रमाचे आयोजन केली जाते. रात्रशाळेत आकाशदर्शन, ग्रहांची माहिती, ध्रुव तारा, गुरु, या ता–यांचे मुलांना दुर्बिणीतून दर्शन घडवले जाते.
असे सातत्याने घेतले जाणारे नवनवीन उपक्रम, हे साईनाथ बालक मंदिरचे वैशिष्ट्य आहे. त्यामधील रात्रशाळा हा मुलांच्या आवडीचा उपक्रम आहे. आकाशात खूप दूर असणारा चंद्र दुर्बिणीच्या सहाय्याने पाहताना मुलांना खूप आनंद होत होता.
उपस्थित सर्वच पालक तीन ते पाच वयोगटातील मुलांचे असल्यामुळे पालकांच्या ही प्रश्नांना खगोलशास्त्र अभ्यासक विपुल खिराडी व त्यांच्या टीमने समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरे दिली.
याविषयी बोलताना मुख्याध्यापिका वैभवी तेंडुलकर म्हणाल्या, श्री साईनाथ बालक मंदिरात असे उपक्रम राबवल्यामुळे लहान वयात मुलांना अवकाशातील तारे या विषयीचे ज्ञान घेण्याविषयी उत्सुकता निर्माण होते व त्यांच्या सर्वांगीण विकासात भर पडते.
याच उपदेशातून हया कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन रेवती नाईक यांनी केले होते, तर स्वाती कुलकर्णी, प्रज्ञा पाठक, मानसी कुंभार, प्रज्ञा जोशी, योगिता देशपांडे यांनीही या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले.