विरोधी पक्षांना नेताच नाही तर ते देश कसे चालवणार – अमित शहा 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे वारे जोरात वाहत आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज कर्नाटकमधील प्रचारसभेत काँग्रेसवर हल्लाबोल चढविला. विरोधी पक्षाला नेताच नसल्याने ते देश कसे चालवणार आहेत, असा प्रश्न अमित शाह यांनी विचारला.

अमित शाह म्हणाले कि, महामिलावटने देशात सरकार बनविले तरी विविध पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान बनविण्यास वेळ लागेल. परंतु, एनडीएचे सर्व पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहेत. आमचे सरकार बनल्यानंतर नरेंद्र मोदींच पुन्हा पंतप्रधान बनविण्याचे आम्ही निश्चित केले आहे. आणि दुसरीकडे महाआघाडी आहे. त्यांना नेताच नसल्याने ते देश कसे योग्य पद्धतीने चालवणार आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मागील चार महिन्यांपासून मी फिरत आहे. उत्तरकडून दक्षिण आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे केवळ एकच घोषणा ऐकायला येत आहे कि मोदी-मोदी, असेही ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या. आणि ज्यांना बहुसंख्य जागा मिळाल्या त्यांनी सर्वात कमी जागा मिळलेल्या पक्षाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले, असेही शहा यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.