नवी दिल्ली – उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित एनडीएचा उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षांनीही रविवारी आपला उमेदवार जाहीर केला आहे. विरोधी पक्षाने मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, एनडीएकडून जगदीप धनखर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मार्गारेट या काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत. मूळच्या कर्नाटकातील, मार्गारेट अल्वा यांनी 6 ऑगस्ट 2009 ते 14 मे 2012 पर्यंत उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले आहे.