Opinion Poll 2024 : देशात पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी ‘एनडीए’ आणि विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने कंबर कसली आहे. त्यातच राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीने देखील निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असल्याचे दिसत आहे. मात्र हे सगळं सूर असताना राज्यातील सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसेल असे सर्वेक्षण समोर आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बाजी मारणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी एबीपी-सी व्होटरने हा सर्वे केला आहे. या सर्वेच्या ओपिनियन पोलनुसार राज्यात सध्याचे सत्ताधारी महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर महाविकास आघाडी 26 ते 28 जागांवर बाजी मारणार असल्याचे या सर्व्हेत सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीच्या पदरात अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. त्याउलट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार, असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले गेले आहे. सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 37 टक्के तर महाविकास आघाडीला 41 टक्के मतं मिळू शकतात.
देशातील तीन ते चार महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यादरम्यान सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण करण्यात आले. लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर कोणाचा विजय किंवा पराभव झाला असता असा प्रश्न विचारण्यात आला. देशातील पाच मोठ्या राज्यांतील जनमत चाचण्यांचे आकडे धक्कादायक आहेत. पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांचा समावेश करून लोकसभेच्या एकूण 223 जागा आहेत. या जागांवरच्या विजयामुळे देशात कोणाची सत्ता येणार हे ठरते. महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. ओपिनियन पोलमध्ये काँग्रेस वरचढ दिसत आहे. आज जर महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली असती तर भाजप+आघाडीला 19 ते 21 जागा मिळतील. तर काँग्रेस आणि मित्र पक्षाला 26 ते 28 जागा मिळतील. तर इतरांना 0-2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मतांच्या टक्केवारीनुसार, भाजप आघाडीला 37 टक्के, काँग्रेस आणि मित्रपक्षाला 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मते मिळतील.
राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा ? (स्रोत- सी वोटर)
* एकूण जागा – 48
* भाजप + 19-21
* काँग्रेस + 26-28
* इतर – 0-2
महाराष्ट्रात मतांच्या टक्केवारीनुसार कुणाला किती मतं ? (स्रोत- सी वोटर)
एकूण जागा – 48
भाजपा + 37%
काँग्रेस + 41%