Car Loan : नववर्षानिमित्त अनेकजण कार घेण्याचा विचार करतात. स्वत:ची कार हवी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण बजेटच्या कमतरतेमुळे अनेकजण कार लोनचा पर्याय निवडतात. कंपन्यांनी कार लोन घेण्याची प्रक्रियाही खूप सोपी केली आहे. तुमचं उत्पन्न आणि परतफेड करण्याची क्षमता पाहून बँका कार लोन सहज प्रोसेस करतात. पण कार लोन किती घ्यायचे याबाबत लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. डाउन पेमेंट किती असावे, कार्यकाळ किती असावा असे प्रश्न मनात राहतात. यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात घेतले पाहिजे.
जर तुम्ही कार लोन घेणार असाल तर तुमच्या एकूण पगाराच्या निम्म्याहून अधिक कार खरेदी करणे टाळा. हा निश्चित नियम नाही परंतु हा नियम पाळल्यास बजेट बिघडत नाही. या नियमात तीन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे तुम्ही तुमच्या कारच्या किमतीच्या सुमारे 20 टक्के रक्कम डाउन पेमेंट म्हणून द्यावी. दुसरा मुद्दा असा की तुम्ही घेतलेले कार लोन 4 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नसावे. तिसरा मुद्दा म्हणजे कार लोनचा ईएमआय तुमच्या पगाराच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.
हे नियम लक्षात घ्या
- कार लोन घेण्यापूर्वी बाजारातील वेगवेगळ्या लेंडर्सद्वारे ऑफर केलेल्या व्याजदरांची तुलना करा. विविध बँका आणि वित्तीय संस्थांची तुलना करून सर्वात कमी व्याजदरासह कार लोन शोधा. व्याजदर जितका कमी असेल तितके कमी व्याज तुम्हाला द्यावं लागेल. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर एकदा तपासा. यापूर्वीची पेमेंट्स तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करतात.
- बँक तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी किती मुदत देते हे एकदा तपासा. अनेकदा असं घडतं की कर्जाचा कालावधी जास्त असतो आणि तुम्हाला कमी हप्ता भरावा लागतो. अशा परिस्थितीत, हे देखील शक्य आहे की आपण कर्जापेक्षा अधिक पैसे फेडता. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कर्जाचा कालावधी निवडा.
- कर्जाची रक्कम आणि व्याजासह बँकेकडून विविध प्रकारचं शुल्कही आकारलं जातं. यामध्ये अर्ज शुल्क, ओरिजिनेशन फी आणि प्रीपेमेंट पेनेल्टी यांसारख्या अनेक शुल्कांचा समावेश आहे. आपण या शुल्कांबद्दल काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. कधीकधी हे शुल्क खूप जास्त असतं. बँकेकडून सर्व माहिती गोळा करा आणि त्यानंतरच कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करा.