पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोहगाव येथील विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होवूनही, केवळ उद्घाटनअभावी टर्मिनल सुरू होत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत टर्मिनल खुले करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने विमानतळ संचालकांना देण्यात आला.
गुरुवारी शिवसेनेकडून विमानतळ संचालक संतोष ढाके यांना भेटून या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, संघटक राजेंद्र शिंदे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, विधानसभाप्रमुख आनंद गोयल, संजय वाल्हेकर, जानू आखाडे, किशोर पाटील मकरंद पेठकर, नंदु येवले, दिलीप मोराळे यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांना घेराव घालून, प्रतीकात्मक कागदी विमान उडवून आंदोलन केले.