नवी दिल्ली – टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपी आणि पाकिस्तानने जम्मू कास्मीरमध्ये विभाजनवादी कारवायांना चिथावणी देण्याच्या हेतूने समान अजेंडा राबवला होता, असे निरीक्षण “एनआयए’ न्यायालयाने नोंदवले आहे. टेरर फंडिंगच्या प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर “एनआयए’ कोर्टाचे न्यायाधीश प्रविण सिंह यांनी हे निरीक्षण नोंदवले.
न्यायालयाने काश्मिरी राजकारणी आणि माजी आमदार रशीद इंजिनिअर, उद्योगपती जहूर अहमद शाह वताली, बिट्टा कराटे, आफताब अहमद शाह, अवतार अहमद शाह, नईम खान, बशीर अहमद भट, उर्फ पीर सैफुल्ला आणि इतर अनेकांवर भारतीय दंड संहिता आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांसह देशाविरोधात युद्ध पुकारणे, गुन्हेगारी कारस्थान करणे आणि बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.
सईद अली गिलानी आणि मोहंमद यासिन मलिक यांच्यासह इकतर काही जणांनी एक निवेदन जाहीर केले होते. त्यामध्ये असलेले मुद्दे आणि दहशतवाद्यांचा अजेंडा आणि अगदी वाक्यरचनाही एकच असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.