नवी दिल्ली – भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे महसूल सचिव संजय मल्होत्रा आणि अमेरिकेच्या दहशतवाद आणि अर्थसाहाय्यविषयक गुप्तचर विभागाचे अवर सचिव ब्रायन नेल्सन यांनी बुधवारी अमेरिका-भारत मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक आणि दहशतवादासाठी अर्थपुरवठा रोखणारा संवाद या मंचावर पुन्हा बैठकीचे आयोजन केले.
या मंचावर आयोजित सत्रांमध्ये सहभागी झालेल्यांनी प्रत्येक देशाचा आभासी मालमत्ता आणि आभासी मालमत्ता सेवा पुरवठादारांसोबतच्या अनुभवांची देवाणघेवाण केली, यामध्ये अवैध अर्थसाहाय्याचे धोके कमी करताना जबाबदार नाविन्याला प्रोत्साहन देण्यावर दोन्ही बाजूंचा भर राहिला. नियामक प्रणालीच्या समस्येची प्रभावी पद्धतीने हाताळणी करण्यासाठी आर्थिक कारवाई कृती दलाच्या शिफारशींना अनुसरून मानकांच्या जागतिक पातळीवरील अंमलबजावणीला तातडीने गती देण्याची गरज दोन्ही पक्षांनी विचारात घेतली.
अधिकारक्षेत्रात निर्बंधांच्या अंमलबजावणी संदर्भातील सध्याच्या आव्हानांबाबत आणि प्रादेशिक पातळीवर आणि जागतिक पातळीवर निर्बंधाना झुगारून देण्याच्या आणि दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याच्या समस्यांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी सहकार्यात वाढ करण्याच्या आणि माहितीची देवाणघेवाण करण्याच्या संधींविषयी देखील चर्चा केली.