बेल्हे -गणेश विसर्जनावेळी केवळ पाचच व्यक्तिंना परवानगी असल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली. बेल्हे (ता. जुन्नर) येथे करोनाच्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी (दि. 28) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्व विषयावर चर्चा झाली.
बेल्हे गाव गुरुवार (दि. 3 सप्टेंबर) पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान असणारा मोहरममध्ये पाच व्यक्तीच ताबूत नेतील. तर गणेशविर्सजन 5 व्यक्तीच करणार असल्याचे ठरवले.
ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर ट्रॉली व पाच माणसांची नियुक्ती करून बाकीच्या मंडळांचे गणपती व घरगुती गणपती त्या पाच व्यक्तींकडे द्यायचे व त्या पाच व्यक्ती सर्व गणपतींचे विर्सजन करणार असल्याचे सांगण्यात आले.