नगरसेवक अमोल बालवडकर यांचा अभिनव उपक्रम
पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून नगरसेवक अमोल बालवडकर आणि मित्र परिवाराच्या वतीने ‘ऑनलाईन योग साधना शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात शहरातील सर्व नागरिकांना सहभागी होता येणार असल्याची माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दिली.
आतंरराष्ट्रीय योग प्रशिक्षक, योगा पदक विजेत्या आणि भारतीय योगा संघाच्या प्रशिक्षक डॉ. मनाली अमोद देव या मार्गदर्शन आणि योगाचे धडे देणार आहेत. येत्या रविवारी ( दि. 21 जून) सकाळी 7 वाजता हे ऑनलाईन शिबीर असणार आहे.
पुणेकरांना फेसबुकवर : https://www.facebook.com/AmolBalwadkarPune/ या लिंकवर तर झूम ऍपवर : https://bit.ly/30Xsj9y या लिंकवर या शिबीरात सहभागी होता येणार असल्याचे बालवडकर यांनी सांगितले.
सध्या जगभरात करोनाची साथ वेगाने पसरत असून योगाच्या माध्यमातून श्वसन प्रक्रीया तसेच शरिराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जगभरात योग केले जात असल्याने पुणेकरांसाठी हे खास शिबीर आयोजित करण्यात आले असल्याचे बालवडकर यांनी स्पष्ट केले.