- पुणे पोलिसांकडून अभ्यास
- कंपनीला करायला लावल्या उपाययोजना
पुणे – ओएलएक्स हे जुन्या वस्तू विक्रीचे एक मोठे ऑनलाइन पोर्टल आहे. देशभरातील लाखो करोडो लोक या वेबसाइटचा वापर करतात. सायबर चोरट्यांनी ही बाब हेरत यामाध्यमातून ऑनलाइन फसवणुकीचे सत्रच सुरु केले.
याचा फटका शेकडो पुणेकरांनाही बसला. दुसरीकडे यासंदर्भात वारंवार तक्रार येत असल्याने पोलीसही हैराण झाले होते. कंपनीला अनेकदा पत्र पाठवूनही ते सुरक्षेच्या दुष्टीने वेबसाइटवर बदल करत नव्हते.
यामुळे अखेर पुणे पोलिसांनीच या गुन्ह्यांचा अभ्यास केला. त्यासंदर्भातील माहिती कंपनीस दिली. तसेच, वारंवार फसवणुकीसाठी वापरले जाणारे सात ते आठ हजार जाहिराती आणि तेवढेच मोबाइल क्रमांक ब्लॉक करून गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर कंपनीने फसवणूक होणाऱ्या बाबींवर उपाययोजना केल्याने गुन्ह्यांच्या तक्रारीचे प्रमाणात 30 ते 35 टक्क्यांची घटले आहे.