नगर – वाघोली येथील जेएसपीएमच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍन्ड रिसर्च या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना झुम ऍपद्वारे ऑनलाइन करीअर बद्दल तसेच महाविद्यालयातूनच नोकरी मिळण्यासाठी लागणारी पूर्व तयारी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाच्या 16 विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. या परीसंवादामध्ये महाविद्यालयातील 100 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये नगरमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.
या चर्चा संयोजन प्रशिक्षण व अस्थापण विभागाचे प्रमुख प्रा. अमोल बाविस्कर यांनी केले.
या परीसंवादामध्ये संकुलाचे संचालक डॉ. विवेक कायंदे, डॉ. एस. एन. पाटील, प्राचार्य डॉ. टी.के. नाराज, जेएसपीएम व टीएसएसपीएमचे विद्यार्थी प्रगती व औद्योगिक समन्वयक प्रमुख संतोष बोरडे, भिवराबाई सावंत पॉलिटेक्निकचे प्रा. राघवेंद्र कडकोल व सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षकही सहभागी होते.