वाघोली – येथील पानमळा (ता. हवेली) परिसरामध्ये असणाऱ्या झेड रेसिडेन्सी परिसरातील सोसायटीमध्ये एक 30 वर्षीय व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. किडनी स्टोनची समस्या असल्याने संबंधिताला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या उपचारादरम्यान करोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यामुळे सोसायटी परिसरामध्ये वाघोली आरोग्य केंद्राने सर्वेक्षण करून ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या पत्नीची व मुलीची चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
आत्तापर्यंत वाघोली गावामध्ये एकूण 8 रुग्ण सापडले आहेत. यापैकी चौघे पूर्णपणे बरे झाले आहेत तर इतर चौघांवर उपचार सुरू आहेत.