नवी दिल्ली, दि.19- जागतीक कंपन्याचा चीनवरील विश्वास कमी झाल्यामुळे जगातील विविध कंपन्या आता आपली उत्पादन केंद्रे चीनमधून इतरत्र हलवीत आहेत. त्यामध्ये भारताला प्राधान्यक्रम मिळण्याची शक्यता आहे. जर्मनीतील व्हॉन वेलेक्स या आरोग्याच्या दृष्टीकोणातून उपयुक्त पादत्राणे बनविणाऱ्या कंपनीने आपले उत्पादन केंद्र भारतामध्ये हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही कंपनी वर्षाला 30 लाख पादत्राणे बनविते. ही पादत्राणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगली असतात असे समजले जाते. यामध्ये 110 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या कंपनीबरोबर भारतातील लॅक्ट्रीक या कंपनीने सहकार्य केले आहे.
लॅक्ट्रक या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष जैन यांनी सांगितले की, लवकरात लवकर उत्पादन सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत.