श्रीनगर : दक्षिण काश्मिरच्या तरल भागात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. दोन जवान या कारवाईत शहीद झाले.
मंगळवारी सुरू झालेली चकमक बुधवारी सुरू होती. या कारवाईत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर जैश ए महंमद या संघटनेचा म्होरक्या ठार झाला. दरम्यान आणखी एक दहशतवाद्याला लष्कराने घेरले असून तेथे गोळीबार सुरू आहे.
तरल भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने शोध मोहीम राबवली. त्यावेळी ही चकमक उडाली. सुमारे 24 तास सुरू असणारा गोळीबार बुधवारी सकाळी पुन्हा सुरू झाला. विशेष पोलिस अधिकारी आणि लष्कराचा एक जवान एक जवान यात शहीद झाला.
झांड गावात दहशतवादी घुसल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. या भागाची नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली. ज्या घरात दहशतवादी लपले होते, तेथे त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. त्यावेळी गोळीबार सुरू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.