#CAA : विरोधात महिलांचे आंदोलन सुरु

पुणे : देशात सुरु असलेल्या सीएए,एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात  आंदोलन सुरु आहे. दिल्ली येथील शाहीन बागच्या धर्तीवर ऑल इंडिया मुस्लिम
ओबीसी ऑर्गनायजेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी मार्केट येथे आंदोलन करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले आणि बिबी फातेमा “पुणे का शाहीन बाग’असे महिलांचे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात सर्व धर्मीय महिला सहभागी आहेत. गुरुवारी सुमारे ५  हजार महिलांचे सर्वधर्मिय प्रार्थना होणार असून  या प्रार्थनेत होम हवन, कुराणपठण, गुरुग्रंथसाहेब पठण होणार आहे.

जेएनयुच्या विद्यार्थी नेत्या शैला रशिद, निवृत्त न्यायाधिश बी.जी.कोळसे पाटील. माजी पोलीस अधिकारी अब्दुल रहमान, तिस्ता सेटलवाड आदिं या आंदोलनात मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी दिली. यावेळी मंजूर शेख, अमीन शेख, जावेद खान आदी उपस्थित होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.