पुणे (प्रतिनिधी) – भरधाव टॅंकरच्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुजर -निंबाळकरवाडी येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बापु वामन चव्हाण(70,रा.गुजरवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा अजय चव्हार (36,रा.एरंडवणे) यानी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचे वडिल 16 मे रोजी दुचाकीवरुन गुजरवाडी येथे रहात्या घरी चालले होते. यावेळी भरधाव पाण्याच्या टॅंकरने त्यांना ठोकर मारली. यामध्ये डोक्यात हेल्मेट नसल्याने गंभीर जखमी होऊन जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर टॅंकरचालक घटनास्थळावरुन पळून गेला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर अज्ञात टॅंकरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस फौजदार एम.एस.देशमुख करत आहेत.