पिंपरी – गांधील माश्या चावल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना देहुरोड येथे मंगळवारी (दि. ५) सकाळी घडली. ईराअण्णा शेट्टी (वय ४० रा. विकासनगर, देहूरोड) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
देहूरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी नऊ वाजता शेट्टी हे भाजी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना गांधील माश्या चावल्यामुळे ईराअण्णा शेट्टी हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान अवघ्या दहा मिनिटांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. शेट्टी यांना हृदयविकाराचाही त्रास होता. तसेच यापूर्वीही त्यांना मधमाश्या चावल्याने ते गंभीर जखमी झाले होते.