मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकारानंतर राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेट घेतली. ‘तुझा दाभोळकर केला जाईल’ अशा स्वरूपाची धमकी ट्विटरच्या माध्यामातून शरद पवारांना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुरीकडे राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देखील आहे.
दरम्यान, आता या प्रकरणावर पहिल्यांदाच स्वतः शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “कोणत्याही विषयावर मत व्यक्त करण्याचा आधिकार सर्व नागरिकांना आहे. आणि असं असताना कोणी धमक्या देवून कोणाचा आवज बंद करू असं वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे.
प्रश्न फक्त एकच आहे, महाराष्ट्र सरकारवर ही जबाबदारी आहे आणि महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्थता सांभाळणारी यंत्रणा, पोलिसदल यांच्या कतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे धमकीची चिंता मी करत नाही’. असं ते म्हणाले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, शरद पवार यांना धमकी दिल्या प्रकरणी सुप्रिया सुळेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेत आहे. तसेच या प्रकरणी लवकरात लवकर धमकी देणाऱ्याला अटक करण्यात यावी अशी मागणी गृहखात्याकडे केली आहे. तसेच काही बरंवाईट झालं तर याला पूर्णपणे देशाचे आणि राज्याचे गृहखाते जबाबदार असेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.