मंचर -घोडेगाव जवळील तळेकरवाडी येथे सागाची झाडे विक्री केल्यावरून एकास तिघांनी मारहाण केली. मंगेश तुकाराम कोकणे (वय 31, रा. म्हाळुंगे तर्फे सुपेधर) यांनी फिर्याद दिली.
सागाची झाडे विक्री करण्याच्या कारणावरून प्रवीण लक्ष्मण इंगवले, दादाभाऊ गणपत इंगवले व लक्ष्मण नाना इंगवले (सर्व रा. इंगलेवाडी) यांनी संगनमत करून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करून दमदाटी केली.
याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संदीप लांडे करीत आहेत.