प्रभास हा बॉलीवूडसह टॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. ज्याने आपल्या मेहनत आणि कौशल्याने चित्रपटसृष्टीत आतापर्यंत यशस्वीपणे कारकीर्द घडविली आहे. त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टसह त्याने स्वत:ला अभिनयसंपन्न असल्याचे दाखवून दिले आहे आणि त्याची ऑन-स्क्रीन कामगिरी याचा पुरावा आहे.
आपल्या चित्रपटांसाठी आणि नावीन्यपूर्ण अभिनयासाठी प्रभास केवळ देशातच नव्हे जगभरात ओळखला जातो. म्हणूनच त्याला “पॅन-इंडिया स्टार’ अशी ओळख मिळालेली आहे. इंटरनेटवर “पॅन-इंडिया स्टार’ असे गुगल सर्च केल्यास प्रभासचेच नाव समोर येते.
प्रभासच्या कामाचे उत्तम उदाहरण म्हणजे दोन भागात प्रदर्शित झालेला “बाहुबली’ चित्रपट, ज्याला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाले आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली आणि आजही त्याची जादू अखंडित आहे. तसेच “साहो’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता, त्यात त्याने अभिनेत्री श्रद्धा कपूरसह बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
दरम्यान, प्रभासच्या आगामी “राधेश्याम’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे, ज्याला त्याच्या सर्व चाहत्यांनी खूप पसंत केले. या पोस्टरला अवघ्या 24 तासांत 63 लाखांहून अधिक ट्विटस्चा आकडा पार केला होता.