बीजिंग – एप्रिल ते जून या तिमाहीत चीनचा विकासदर 3.2 टक्के झाला असल्याचा दावा चीनच्या संख्याशास्त्र विभागाने केला आहे.
या विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून या काळातील विकासदर 3.2 टक्के नोंदला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत विकासदर उणे 4.8 टक्के इतका झाला होता. एवढ्या कमी कालावधीमध्ये विकासदर वाढल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून या आकडेवारीची शहानिशा जागतिक पातळीवर होऊ लागली आहे.
जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढली असली तरी रिटेल विक्री आणखी पूर्वपदावर आलेली नाही.