नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या आदल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या योगावरील वेबिनारमध्ये सीआरपीएफचे दीड लाख जवान सहभागी झाले होते. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान विद्यापीठातर्फे हे वेबिनार आयोजित करण्यात आले होते. ही संस्था म्हणजे योगावर संशोधन करणारी पहिली विद्यापीठ स्तरावरील संस्था आहे.
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे योग सेमिनार झाले. युट्युबवरूनही त्याचे सादरीकरण सीआरपीएफ जवानांसाठी करण्यात आले. त्यात या जवानांचे कुटुंबियही सहभागी झाले होते. सीआरपीएफ मध्ये एकूण 3 लाख 25 हजार जवान कार्यरत असून त्यांच्यासाठी तेथे 1100 योग प्रशिक्षक तैनात करण्यात आले आहेत. उद्या सर्वत्र योग दिवस साजरा होत आहे.
पण सध्याच्या करोनाच्या वातावरणामुळे तो सार्वजनिक स्वरूपात जाहीर केला जाणार नाही. त्यासाठी वेबिनार, व्हिडीओ कॉन्फरसिंग अशाच साधनांचा वापर केला जाणार आहे.