रांची, – झारखंड राज्यात पोलिस महासंचालक, अतिरीक्त पोलिस महासंचालक या दर्जाच्या अधिकाऱ्यांसह एकूण दीडशे वरीष्ठ पोलिस अधिकारी करोनाग्रस्त झाल्याचे आढळून आले आहे.
काल 98 पोलिस अधिकारी करोनाग्रस्त झाल्याचे आढळून आले होते तर आज आणखी 50 अधिकारी करोना बाधित झाले आहेत. हे बहुतांशी आधिकारी आयपीएस दर्जाचे आहेत. यात रांची वरीष्ठ पोलिस अधिक्षक कार्यालयातीलच 35 अधिकारी करोना बाधित झाल्याचे दिसून आले आहे.
पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होणे नवीन नाही पण एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वरीष्ट पोलिस अधिकारी करोनाग्रस्त होणे हे दुर्मिळ मानले जात आहे. या संबंधात आता पोलिस दलात पातळीवर विशेष दक्षता घेतली जात आहे.