पुन्हा एकदा मुळशीचा ‘पॅटर्न’ बदलतोय

पिरंगुट – मुळशी तालुका हा पहिलवानांचा तालुका म्हणून ओळखला जात होता. अनेक उत्तम खेळाडू या मातीने देशाला दिले. मध्यंतरी मात्र हा तालुका गुन्हेगारांचा तालुका म्हणून ओळखू जाऊ लागला. गुन्हेगारांचा एक मुळशी पॅटर्न तयार झाला. पण आता पुन्हा मुळशीतली लहान मुले वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धामध्ये चमकत आहेत. ही एक चांगली बाब आहे. पुन्हा एकदा मुळशीचा पॅटर्न बदलतोय, असे मत निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.

कासारआंबोली (ता. मुळशी) येथे ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्याव उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भानुप्रताप बर्गे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, संस्थेचे अध्यक्ष कृष्णा भिलारे, सचिव संगीता भिलारे, तेजस रसाळ उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.