बिहार – येत्या रविवारी लोकसभा निवडणुकांमधील शेवटचा म्हणजेच सातवा टप्पा पार पडणार असल्याने सातव्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देशातील प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आज बिहार येथील पालिगंज येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान होऊ असा विश्वास प्रकट केला.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “ही माझी शेवटची प्रचार सभा असल्याने 2019 लोकसभा निवडणुकांसाठी तुमचा आशीर्वाद मागण्याची ही माझ्यासाठी शेवटची संधी आहे. मात्र यानंतर मी पंतप्रधान पदाचा सेवा-भावाने स्वीकार करून पुन्हा एकदा तुमच्यासाठी विकासाची गंगा घेऊन परत येईल.”