अकोले – समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत येत असतात. यापूर्वी त्यांचा करोना संबंधी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण केला आहे. मी माळकरी आहे, म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच. त्यांच्या या विधानाच्या क्लिप सोशलवर मीडियावर चांगल्याच व्हायरल झाला होत्या. त्यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरूनच आता त्यांनी पुन्हा एकदा आपलं मत अकोले गावात कीर्तनाच्या कार्यक्रमादरम्यान मांडले आहे.
ते म्हणाले,’इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर युट्यूबर्स होते. माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ शेअर करून हजारो युट्यूबर्स कोट्यधीश झाले आणि माझ्या कीर्तनाच्या क्लिप तयार करून मलाच न्यायालयात उभे केले, अशी टीका इंदुरीकर महाराजांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले,’हजारो युट्यूबवाले कोट्याधीश झाले. अन् माझ्याच कीर्तनाच्या क्लिप बनवून मलाच न्यायालयात खेचले. यांचे वाटोळच होणार. यांचे चांगले होणार नाही, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर जोरदार हल्लाबोल केला.
एवढेच नाही तर युट्यूबरने कोट्यवधी रुपये कमावले यांनी आणि अडचणीत आलो मी. कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असे इंदुरीकर म्हटले आहे. संपूर्ण कीर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून आला.